अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार, राऊत, मलिकांवर चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:28 PM2022-02-17T16:28:59+5:302022-02-17T16:32:00+5:30

माझे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक शत्रूत्व नाही

Criticism of Chandrakant Patil on Sanjay Raut and Nawab Malik | अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार, राऊत, मलिकांवर चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र 

अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार, राऊत, मलिकांवर चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र 

Next

कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये बेछूट आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे संजय राऊत, नवाब मलिकांसारखे केवळ अब्रु नुकसानीच्या दाव्यांसाठीच्या हेलपाट्यांनीच मरणार आहेत अशा तिखट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, जुनी थंड प्रकरणे उकरून काढून राऊत हे ठाकरे यांनाच अडचणीत आणत आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे वाटू लागले आहे. अशामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत असल्याच्या अजित पवार यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे.

समीर वानखेडेंवर रोज आरेाप झाले. राष्ट्रीय मागास आयोगाने आता नोटीसा काढल्या आहेत. गेल्या २७ महिन्यात न्यायालयांनी इतके फटके देवूनही यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. आता सोमय्या, काळे, कंबोज सगळेच कोर्टात जातील. राऊत यांनी धमक्या देवू नयेत. त्यांचे सरकार आहे. थेट कारवाई करून दाखवावी असे आव्हानच पाटील यांनी यावेळी दिले.

मी राऊतांच्या मुलीच्या घरी जावून आलो

माझे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक शत्रूत्व नाही. त्यांच्या मुलीच्या लग्नाला जाता आले नाही मी तिच्या सासरी जावून तिला शुभेच्छा देवून आलो. परंतू माझ्या पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोप केल्यानंतर मी बोलणारच असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्ही हात काढून घेत नाही

आपल्याच माणसांना दिलेला हात काढून घेण्याची आमची संस्कृती नाही. अनिल देशमुख आत आहेत तर तिकडे कोणी फिरकलाही नाही. छगन भुजबळ यांच्याबाबतही असेच झाले. पण आम्ही तसे नाही असेही पाटील म्हणाले.

Web Title: Criticism of Chandrakant Patil on Sanjay Raut and Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.