‘झूम’साठी कोटीची सुपारी

By admin | Published: June 17, 2015 12:58 AM2015-06-17T00:58:12+5:302015-06-17T01:05:20+5:30

व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न : पालिका सभेत ४० विषयांवर होणार चर्चा

Crocodile betel nut for 'zoom' | ‘झूम’साठी कोटीची सुपारी

‘झूम’साठी कोटीची सुपारी

Next

कोल्हापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १९) होत आहे. या सभेपुढे आरक्षणात बदल, झोन बदल, मुदतवाढ, आदी ‘आंब्यां’च्या विषयासह रुग्णालयासाठी असलेल्या १३ कलमी फायर अ‍ॅक्टच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे. लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्प हटविण्याच्या नागरिकांच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करीत बफर झोनची व्याप्ती ४०० मीटरने कमी करण्याचा ठराव घुसडण्यात आला आहे. यासाठी तब्बल कोटी रुपयांची सुपारी फुटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी वि. स. खांडेकर प्रशालेच्या दक्षिण बाजूकडील जागा मंजूर केली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९च्या मैदानावर ‘मराठा भवन’ होण्यासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला आहे. शहरातील तब्बल ३५० हून रुग्णालये केंद्र शासनाने ठरवलेल्या अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन करू शकत नाहीत. परिणामी या रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने रुग्णांना विमा सेवा मिळण्यात अडचणी आहेत. या रुग्णालयांवरही टांगती तलवार आहे. अग्निप्रतिबंधक नियमामध्ये शिथिलता देण्याबाबत सभेत चर्चा होणार आहे. कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना सवलतीच्या दरात कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मार्केट यार्ड येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत मंजुरी घेतली जाणार आहे. महापालिकेच्या वापरात नसलेल्या तब्बल नऊहून अधिक शाळांच्या इमारतींंचा पीपीपी तत्त्वावर विकास करून त्या भाड्याने दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)


बांधकाम व्यावसायिक ांचे हित सांभाळण्यासाठीच ठराव
लाईन बझार येथे कचरा डेपो असलेल्या झूम प्रकल्पाशेजारील ५०० मीटरचा परिसर हा बफर झोन आहे. याची व्याप्ती कमी करून १०० मीटरवर आणण्याचा नगरसेवकांचा विचार आहे. झूम प्रकल्पाभोवतालच्या जमिनीचा भाव ३० लाख रुपये गुंठा याप्रमाणे सुरू आहे. आरोग्यास घातक ठरत असलेला हा प्रकल्प येथून हटविण्याची नागरिकांची मागणी आहे. याबाबत चर्चा किंवा निर्णय न घेता बफर झोनची व्याप्ती कमी करण्याचा ठराव सभेपुढे आणला आहे. परिसरातील जागेवर असणारा डोळा व बांधकाम व्यावसायिक ांचे हित सांभाळण्यासाठीच हा ठराव संमत करण्याची घाई सुरू आहे. हा ठराव संमत करून त्याचा अंमल करण्यासाठी तब्बल कोटी रुपयांची सुपारी फुटल्याची चर्चा महापालिकेत आहे.

Web Title: Crocodile betel nut for 'zoom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.