इचलकरंजीत पंचगंगा नदीत मगरीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:58+5:302021-09-24T04:29:58+5:30
वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतीरी असलेल्या बेडक्याळे यांच्या मळ्यात गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या ...
वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतीरी असलेल्या बेडक्याळे यांच्या मळ्यात गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मगरीचे दर्शन झाले. मगरीच्या दर्शनामुळे नदीकाठी जाण्यास अथवा नदीकाठांवरील शेतात काम करण्यास शेतकरी घाबरत आहेत. शेतामध्ये कामानिमित्त शेतकरी नेहमी येत असतात. त्यांना धोका पोहोचू नये यासाठी वनविभागाने त्वरित या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
काही दिवसांपूर्वी पंचगंगा नदीला महापूर येऊन गेल्याने मगरीचा नदीकाठ परिसरात सर्रास संचार वाढला आहे. पूर ओसरल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील मोटारींची दुरुस्तीचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महावीर बेडक्याळे शेतात गेले असता त्यांना नदीकिनारी मगर असल्याचे आढळले. यावेळी बाजूच्या शेतात असलेल्या अविनाश कोरे, रावसाहेब मगदूम, जयपाल बेडक्याळे, राहुल चनविरे या शेतकऱ्यांनी धाव घेतली. याची माहिती मिळताच तलाठी स्वप्निल घाटगे यांच्यासह वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून ठसे घेतले. यावेळी वनअधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.