'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:02 PM2020-09-05T18:02:42+5:302020-09-05T18:09:35+5:30

कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पुनाळला जाणाऱ्या युवकांना चक्क बंधाऱ्यावर आडवी निवांत थांबलेल्या सहा फुटांहून अधिक लांबीच्या मगरीचे दर्शन झाले.

Crocodile sighting on 'Rajaram' embankment | 'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन

राजाराम बंधाऱ्यावर आलेली मगर मोटरसायकलचे उजेडात अशी दिसली.

Next
ठळक मुद्दे'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन बंधारा आणि नदीच्या पाण्याची पातळी एकच झाल्याने आली बंधाऱ्यावर

कसबा बावडा: कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पुनाळला जाणाऱ्या युवकांना चक्क बंधाऱ्यावर आडवी निवांत थांबलेल्या सहा फुटांहून अधिक लांबीच्या मगरीचे दर्शन झाले.

कसबा बावडा रेस्क्यू फोर्सचे निलेश पिसाळ यांना ही माहिती कळताच त्यानी काही तरुणांना सोबत घेऊन बंधाऱ्यावर पाहणी करून मगर कुठे जाते हे पाहिले .मात्र काही वेळाने ही मगर वडणगे जॅकवेलच्या बाजूला नदीत गेली.

गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात मगरीचा वावर आढळून येत आहे. शुक्रवारी पंचगंगा नदी बंधार्‍यावरून वाहत होती. नदी आणि बंधारा यांची पाण्याची पातळी एकच होती त्यामुळे नदीतील मगरीला बंधाऱ्यावर अगदी सहज येता आले. ती बराच वेळ बंधाऱ्यावर थांबली होती. मोटरसायकलचा तिच्यावर उजेड पडला तरी ती पाण्यात जात नव्हती.

आज शनिवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी मगरीचा शोध घेतला. मात्र त्यांना मगर आढळून आली नाही. मात्र तिच्या अस्तित्वाची ठसे आढळले. पंचगंगा नदी पत्रात मगरीचा वावर असल्याने नदीला सकाळी पोहण्यासाठी कोणीही जावू नये असे आवाहनन कसबा बावडा रेस्क्यू फोर्स च्या वतीने करण्यात आले आहे.

जमिनीवर असलेल्या मगरीची ताकद पाण्यात असल्यानंतर जास्त वाढते. त्यामुळे मगरीला पाण्यात असताना पकडणे काहीशी अवघड असते. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या बहुतेक मगरी या पाण्याबाहेर आल्यानंतरच त्यांना पकडण्यात आले आहे .
 

Web Title: Crocodile sighting on 'Rajaram' embankment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.