सरूडच्या धरणग्रस्त वसाहतीत मगरीचा शिरकाव; शिताफीने जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:25 PM2019-07-29T14:25:40+5:302019-07-29T14:26:56+5:30
सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील तरुणांनी शिताफीने जेरबंद करुन वन विभागाचा ताब्यात दिले. भर वस्तीत अपरात्री आलेल्या या मगरीमुळे परिसरातील नागरिकांची गाळण उडाली.
सरूड : सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील तरुणांनी शिताफीने जेरबंद करुन वन विभागाचा ताब्यात दिले. भर वस्तीत अपरात्री आलेल्या या मगरीमुळे परिसरातील नागरिकांची गाळण उडाली.
याबाबत अधिक माहीती अशी, गेल्या काही वषार्पासुन सरुडच्या ऐतिहासीक गाव तलावात मागरींचा वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. यासाठी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थानी स्थानिक प्रशासन व वन विभागाकडे मागणीही केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष होत राहिले. शनिवारी रात्री पावसाची रिपरिप सुरु असताना रात्री साडेदहाच्या सुमारास ही मगर तलावा शेजारी असणाऱ्या नवीन वसाहतीमधील नागरी वस्तीत शिरली.
रात्रीची वेळ असल्याने सुरवातीस ही मगर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली नाही. परंतु वसाहतीमधील साधु घोलप व दत्ता पाटील हे घराबाहेर आले असता त्यांच्या बँटरीच्या उजेडात सदर मगर त्यांच्या राहत्या घराशेजारील रस्त्याच्या कडेला दिसून आली. त्यानंतर त्यांनी त्वरीत स्थानिक तरुणानां बोलविले. यावेळी संपत जाधव, सुनिल सुतार, सागर जाधव, नितेश देसाई, नितीन डंबे, नितीन यादव, दिपक कांबळे, दत्ता पाटील, रणजीत कांबळे, अरुण घोलप, अमोल पाटील, विश्वजीत खोत आदी तरूणांनी मोठ्या धाडसाने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला सुखरूप जेरबंद केले.
पोलिस पाटील दिपाली घोलप यांनी दिली वन विभागाच्या कर्मचां-याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या घटनेची माहीती दिली. दरम्यान रात्री दिडच्या सुमारास मलकापूर वनविभागातील वनपाल रशिद गारदी, वन कर्मचारी शंकर लव्हटे, सुरज पाटील, अमर शिंदे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानी मगरीस आपल्या ताब्यात घेऊन मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या सुचनेनसार रविवारी पहाटे अज्ञात परंतु सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.