चिंधवलीमधील युवकांनी मगरीला पकडले; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:40 AM2019-11-18T09:40:08+5:302019-11-18T09:40:15+5:30

वाई तालुक्यातील चिंधवली येथे गेल्या दोन महिन्यांपासून दिसत असलेली मगर गावामधील तरुणांनी अखेर रविवारी रात्री पकडली.

CROCODILE was CATCH by the youth in Chindavali | चिंधवलीमधील युवकांनी मगरीला पकडले; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

चिंधवलीमधील युवकांनी मगरीला पकडले; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Next

 

पाचवड : वाई तालुक्यातील चिंधवली येथे गेल्या दोन महिन्यांपासून दिसत असलेली मगर गावामधील तरुणांनी अखेर रविवारी रात्री पकडली. त्यानंतर ती वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित मगर येथील युवकांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर लगेचच वनविभागाशी संपर्क करून याबाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र वनविभागाकडून कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत होते. 

चिंधवली ते किसन वीर सहकारी साखर कारखाना रस्त्यावरील मोरेवस्ती या लोकवस्तीमध्ये मगर आल्याची माहिती काही युवकांना मिळाली.  केल्यानंतर येथील युवकांनी मोठ्या शिकस्त करून मगरीला पकडले. त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात दिले. युवकांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: CROCODILE was CATCH by the youth in Chindavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.