शेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम : दौलत देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:39 PM2020-02-11T14:39:37+5:302020-02-11T14:41:07+5:30

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

Crop loan supply campaign for beneficiaries of farmers honor: Daulat Desai | शेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम : दौलत देसाई 

शेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम : दौलत देसाई 

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम : दौलत देसाई  कृषी मंत्रालयाचे आदेश

कोल्हापूर : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

जिल्ह्यामध्ये ४ लाख ४७ हजार ८५६ शेतकरी या योजनेचे लाभार्थी असून, यापैकी ३ लाख १३ हजार ८०८ शेतकºयांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ३४ हजार ४८ इतकी आहे. या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ फायनान्शियल सर्व्हिसेस तथा कृषी मंत्रालयाकडून आदेश देण्यात आला आहे.

या शेतकºयांना अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेमधून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे, तेथे संपर्क साधावा.

कोणतेही कर्ज न घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

ही विशेष मोहीम दि. २५ तारखेपर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

 

Web Title: Crop loan supply campaign for beneficiaries of farmers honor: Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.