गांधी मैदानासाठी कोटींचा निधी; पालकमंत्री पाटील : अजित इंगवले यांचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:42 AM2021-03-04T04:42:41+5:302021-03-04T04:42:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी पेठेची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचा विकास करण्यासाठी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अजित इंगवले यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी पेठेची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचा विकास करण्यासाठी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अजित इंगवले यांनी निधी देण्याची मागणी करताच, पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीने एक कोटींचा निधी मैदानाच्या दुरुस्तीसाठी दिला आहे.
पेठेतील खेळाडूंचे हे मैदान म्हणजे श्वास आहे. परंतु त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी त्याचे तळे बनते. मैदान झुडपांनी वेढले आहे. बैठक व्यवस्था असणारे क्राँकिटीकरण खराब झाले आहे. रेलिंगला गंज चढल्याने ते मोडकळीस आले आहे. ही सर्व कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.
निधीचे पत्र मिळताच इंगवले यांनी पालकमंत्री पाटील यांचा सत्कार केला. यावेळी शारंगधर देशमुख, पद्मजा तिवले, सचिन चव्हाण, संभाजी साळोखे, उदय इंगवले, संभाजी साळोखे, राजू समर्थ, रूपेश पाटील, भालचंद्र कुलकर्णी, कुणाल देशपांडे आदी उपस्थित होते.
०२०३२०२१-कोल-गांधी मैदान
कोल्हापुरातील गांधी मैदानाच्या विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी एक कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचा अजय इंगवले यांनी सत्कार केला.यावेळी शारंगधर देशमुख, पद्मा तिवले, सचिन चव्हाण, उदय इंगवले आदी उपस्थित होते.