पाल यात्रा शांततेत पार पाडा
By admin | Published: December 24, 2014 11:32 PM2014-12-24T23:32:45+5:302014-12-25T00:03:29+5:30
अभिनव देशमुख : नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांना आवाहन
काशीळ : ‘श्री खंडोबा यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, भाविकांच्या गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनावर असून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी खंडोबा यात्रा शांततेत व जबाबदारीने पार पाडावी,’ असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
३ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी फडतरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
मिरवणुकीचा मार्ग सोडून काही अंतरावर व्यावसायिकांना दुकानासाठी यात्रा कमिठीमार्फत परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती देवराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील, उत्पादन शुल्कचे नवलेकर उपसरपंच संजय गोरे, अशोक काळभोर, रघुनाथ खंडाईत, उद्धवराव फाळके, सुंदेश पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
यात्रा स्थळावर सीसीटीव्ही
नियमबाह्य विद्युत जोडणी करणाऱ्यांवर कारवाई
पोलीस, होमगार्ड व टास्क फोर्सची नियुक्ती
आरोग्य विभागाची तीन पथके, ज्यादा रुग्णवाहिका
उत्पादन शुल्क विभागाची चार भरारी पथके
पाच अग्निशमन दलाची व्यवस्था
मानकऱ्यांना देवस्थानचे ओळखपत्र आवश्यक
यात्रा परिसराची पाहणी करताना पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार आदी.