शित्तूर-आरळा पुलाला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:28+5:302021-02-24T04:26:28+5:30

सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर व शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणारा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत ...

Cross the Shittur-Arla bridge | शित्तूर-आरळा पुलाला भेगा

शित्तूर-आरळा पुलाला भेगा

googlenewsNext

सतीश नांगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर व शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणारा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वारणा नदीवरील शित्तूर ते आरळादरम्यान असलेल्या पुलाला दोन पिलरच्या जॉइंटमध्ये मोठ्या भेगा पडल्यामुळे या पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या कॉम्पेक्शन गॅपमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

या पुलाचे बांधकाम जवळजवळ वीस वर्षांपूर्वी झाले आहे. मात्र, या पुलाच्या दोन पिलरमध्ये असलेल्या जॉइंटमध्येच सध्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. यामुळे निर्माण झालेल्या गॅपमध्ये वाहनधारकांनी कित्येकदा दगडगोटे व माती टाकून या भेगा बुजविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यावरूनच वाहतूक सुरू आहे.

या रस्त्यावरून उखळू, शित्तूर-वारुण, शिराळे-वारूण, खेडे, या परिसरातील सर्व धनगर वाडे व इतर वाड्या वस्त्यावरील गावचे ग्रामस्थ, शाळा-कॉलेजचे विध्यार्थी याच रस्त्याने ये-जा करतात. शिवाय उदगिरी गावातील कालिका मंदिराकडे जाणाऱ्या भाविक भक्तांची या रस्त्यावर मोठी रहदारी असते. एसटी, ट्रक, टेम्पो, ऊस वाहतूक करणारे मोठे ट्रॅक्टर अशी अवजड वाहने त्याचबरोबर चारचाकी व दोन चाकींचीही या पुलावरून रोज वर्दळ सुरू असते.

सध्या या पुलाच्या दोन पिलरमध्ये पडलेल्या भेगा व त्यावरून सुरू असलेली धोकादायक वाहतूक ही चिंतेची बाब असून, संबंधित विभागाचे याबाबतीत डोळे कधी उघडणार, की एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न विद्यार्थी, प्रवासी व वाहनधारकांबरोबरच ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

फोटो :

शित्तूर ते आरळादरम्यान असलेल्या वारणा नदीवरील पुलाला दोन पिलरच्या जॉइंटमध्ये पडलेल्या मोठ्या भेगा (छाया- सतीश नांगरे)

Web Title: Cross the Shittur-Arla bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.