जिल्ह्यात ४ हजार २७ जागांसाठी ... अर्ज दाखल शेवटच्या दिवशी केंद्रांवर उमेदवारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:25 AM2020-12-31T04:25:47+5:302020-12-31T04:25:47+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील ४ हजार २७ जागांसाठी तब्बल ... इतक्या जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील ४ हजार २७ जागांसाठी तब्बल ... इतक्या जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या पाच दिवसातील ही आकडेवारी असून अखेरच्या दिवशी ऑफलाईन तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ वाढवण्यात आल्याने उमेदवारांची केंद्रांवर मोठी गर्दी होती. आज, गुरुवारी अर्जाची छाननी होणार असून माघारीसाठी सोमवारपर्यंतचा (४ जानेवारी) कालावधी आहे.
जिल्ह्यात सध्या ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या दिवशी... इतक्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर मागील चार दिवसांत एकूण ८ हजार ७१२ व्यक्तींनी ८ हजार ८९१ अर्ज दाखल केले. अशा रीतीने जिल्ह्यातील १२ तालुक्यांतून .... उमेदवारी अर्ज आले आहेत. अखेरच्या दिवशी सर्व तालुक्यातील तहसिलदार कार्यालये, तसेच केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुकांची व समर्थकांची मोठी गर्दी होती.
आज अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारांना सोमवारपर्यंत माघार घेता येईल. या दिवशी चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याचा महत्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता गावागावातील गटातटांचे स्थानिक राजकारण, नेत्यांचा पाठिंबा, इच्छूकांची मोर्चे बांधणी, प्रचाराची रणनिती या घडामोडींना वेग आला आहे. माघारीनंतर किती गावांत बिनविरोध निवडणूक होतील हे स्पष्ट होईल.
---
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : ४३३
एकूण प्रभाग संख्या : १ हजार ४९१
सदस्य संख्या : ४ हजार २७
आलेल्या अर्जांची संख्या : ..
तालुक्याचे नाव : दाखल झालेले अर्ज शाहूवाडी :
पन्हाळा :
हातकणंगले :
शिरोळ :
करवीर
गगनबावडा :
राधानगरी :
कागल :
भुदरगड :
आजरा :
गडहिंग्लज :
चंदगड :
---
१५ जानेवारीला होणार फैसला
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गावागावातील राजकारणाला आणि घडामोडींना वेग आला आहे. १२ तालुक्यांतील ४३३ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार २७ सदस्य असणार आहेत. त्यांच्यासाठी ९.२९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १ हजार ७७४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
--
सूचना : अर्ज भरण्यासाठी गर्दी फोटो आधी पाठवला आहे.