अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, सुटीमुळे पर्यटक वाढले; भवानी मंडपापर्यंत रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 05:12 PM2018-12-25T17:12:09+5:302018-12-25T17:13:33+5:30

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी भाविकांची भवानी मंडपापर्यंत रांग लागली होती. नाताळच्या सुटीमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली.

A crowd of devotees to visit Ambabai, tourists increased due to holiday; Queue up to Bhavani Mandap | अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, सुटीमुळे पर्यटक वाढले; भवानी मंडपापर्यंत रांग

कोल्हापुरात मंगळवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. भवानी मंडपापर्यंत भाविकांच्या रांग लागली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देअंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दीसुटीमुळे पर्यटक वाढले; भवानी मंडपापर्यंत रांग

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी भाविकांची भवानी मंडपापर्यंत रांग लागली होती. नाताळच्या सुटीमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली.

चौथा शनिवार आणि नाताळच्या सुटी असल्याने कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. शनिवारपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात भाविक येत आहेत. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी गर्दी कायम राहिली. मंगळवारी सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. त्यांची रांग भवानी मंडपापर्यंत आली होती. उन्हाळामुळे दुपारी काहीवेळ गर्दी कमी झाली.

सायंकाळनंतर भाविकांची संख्या पुन्हा वाढली. अंगारकी संकष्टी असल्याने मंदिरातील सिद्धीविनायक गणेशाचे दर्शन भाविकांनी घेतले. भवानी मंडप, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर आणि महाद्वाररोड मार्गावर पर्यटक, भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली.

दरम्यान, याबाबत देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी सांगितले की, नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले.

महिला भाविकाला चक्कर

मंदिरात दर्शनासाठी मंगळवारी आलेल्या कोल्हापूरमधील महिला भाविकाला दुपारी पावणेएकच्या सुमारास चक्कर आली. त्यांना तातडीने देवस्थान समितीच्या प्रथमोपचार केंद्रामध्ये आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले शिवाय त्यांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे समितीचे व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले.

 

 

Web Title: A crowd of devotees to visit Ambabai, tourists increased due to holiday; Queue up to Bhavani Mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.