‘टोमॅटो चेरी’, ‘तैवान पपई’ ‘सतेज कृषी’चे आकर्षण; पहिल्याच दिवशी तुडुंब गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 01:19 PM2022-12-24T13:19:27+5:302022-12-24T13:19:53+5:30
शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयाचे तंत्रज्ञान पाहावयास मिळणार
कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनात ‘टोमॅटो चेरी’, ‘तैवान पपई’, साडेतीन फुटांचा दुधी आकर्षण ठरले आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. उद्या, रविवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.
तपोवन मैदानावर सतेज कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी झाले. सायंकाळपासूनच प्रदर्शनाने गर्दी खेचली आहे. प्रदर्शनात दोनशेहून अधिक स्टॉल असून, शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयाचे तंत्रज्ञान पाहावयास मिळणार आहे.
पहिल्या दिवशी कागल तालुक्यातील हणबरवाडी येथील पुंडलिक कृष्णा डाफळे यांच्या शेतातील ‘तैवान’ जातीचा पपई सगळ्यांचे आकर्षण ठरले होते. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील सुनील पाटील यांच्या ‘चेरी’ वाणाचा लहान टाेमॅटोने सगळ्यांनाच भुरळ पाडली. त्याशिवाय इतर फळे, फुले, खाद्यांचे स्टॉलवर गर्दी होती.
प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये
तांदूळ महोत्सव
दोनशेहून अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग
दोनशेहून अधिक पशू-पक्ष्यांचा सहभाग
शेतीविषयकतज्ज्ञांचे मार्गदर्शन
शेती अवजारे, बी-बियाणे, खतांचे स्टॉल
फुलांचे प्रदर्शन व विक्री
बचत गटांचे स्टॉल
लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क
देशात परिवर्तन होईल- जिग्नेश मेवानी
गुजरातमध्ये काँग्रेसला अपयश आले, याबाबत आत्मचिंतनाची गरज आहे. मात्र, हिमाचल प्रदेशात चांगले यश मिळाले. आगामी काळात कर्नाटकसह इतर राज्यांत काँग्रेस मुसंडी मारेल. देशात परिवर्तन अटळ असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग देशातही राबवला पाहिजे, असे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.