शिरोळमध्ये भाजी व किराणा खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:09+5:302021-05-06T04:24:09+5:30
शिरोळ : शहरात बुधवारी भाजी व किराणा खरेदीसाठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसांचा कडक ...
शिरोळ : शहरात बुधवारी भाजी व किराणा खरेदीसाठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र, तो आठ तासांने मागेदेखील घेतला होता. दरम्यान, ‘जनता कर्फ्यू’बाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने भाजी व किराणा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यातच बाजारात होणारी गर्दी ही प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून जनजागृती सुरू आहे. सकाळी साते ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश असले तरी बाजारातील गर्दी हटायला तयार नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, सोशल मीडियावरुन टीका झाल्यानंतर आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दिवसभर जनता कर्फ्यूबाबत संभ्रमावस्था दिसत होती.
चौकट - शिरोळमध्ये १३५ रुग्ण
शिरोळमध्ये मंगळवारपर्यंत १३५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये आठजणांचा मृत्यू झाला आहे; तर ४० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फोटो - ०५०५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे बाजारात बुधवारी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.