लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे शिरोळमध्ये उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:03+5:302021-05-25T04:26:03+5:30
शिरोळ / जयसिंगपूर : कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सोमवारी शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. सकाळी सात ...
शिरोळ / जयसिंगपूर : कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सोमवारी शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. सकाळी सात ते अकरा यावेळेत भाजी खरेदीसाठी झुंबड उडाली होती, तर केडीसीसी बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. जयसिंगपूर, शिरोळमध्ये बँकेसमोर गर्दी झाली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारपासून या लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते अकरा यावेळेत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी व दैनंदिन व्यवहारासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. मात्र, याकडे काही नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र बाजारात पहावयास मिळाले. शिरोळ येथे केडीसीसी बँकेत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग दिसूनच आले नाही.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०४, ०५
फोटो ओळ - ०४) शिरोळ येथील केडीसीसी बँकेत सोमवारी लोकांनी अशाप्रकारे रांगा लावल्या होत्या.
०५) शिरोळ येथे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. (सर्व छाया-सुभाष गुरव, शिरोळ)