गर्दीमुळे विरोधकांच्या अपप्रचाराला चपराक

By admin | Published: October 26, 2016 10:27 PM2016-10-26T22:27:53+5:302016-10-26T22:27:53+5:30

महाराष्ट्रासह कर्नाटकातीलही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित ऊस परिषद ठरली उच्चांकी

Crowds of Opponent's Oppression due to the crowd | गर्दीमुळे विरोधकांच्या अपप्रचाराला चपराक

गर्दीमुळे विरोधकांच्या अपप्रचाराला चपराक

Next

जयसिंगपूर : मंगळवारी जयसिंगपूर येथे अग्रगण्य संख्येत ऊस परिषद पार पडली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पहिली उचल ३२०० रुपये द्या, या मागणीसाठी ऊस परिषदेत रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानीकडून आतापर्यंत चौदा ऊस परिषद घेण्यात आल्या. मात्र, १५ व्या ऊस परिषदेसाठी उच्चांकी गर्दी झाल्याने विरोधक व सोशल मीडियावरती फिरणाऱ्या चुकीच्या मेसिजना मूठमाती मिळाली आहे. गेल्या महिनाभरापासून २५ आॅक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती. तसेच या ऊस परिषदेत एफआरपीचा मुद्दा नसल्यामुळे या ऊस परिषदेत फक्त दराचा निर्णय असल्यामुळे या ऊस परिषदेला गर्दी होणार नाही, असे मत जाणकार व्यक्ती व विविध राजकीय पक्षांकडून व सोशल मीडियावर पाहायला मिळत होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजू शेट्टी, कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा, सांगली, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्हे तसेच कर्नाटकच्या सीमा भागात ऊस परिषदेच्या बैठका घेऊन परिषदेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठका, मेळावे, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंगळवारी ऊस परिषदेच्या दिवशी दुपारपर्यंत ऊस परिषदेला महत्त्व नाही. तसेच भाजप सत्तेत स्वाभिमानी हा मित्रपक्ष असल्याने आता काय दर मागणार आहेत. जादा ऊसदर मागणी होणार नाही आणि उत्साह कमी असल्याचे सोशल मीडियावर मेसेज फिरत होते. मात्र, महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या घामाचा दाम मिळविण्यासाठी परिषदेला हजर राहिल्याने विरोधक व सोशल मीडियाच्या संदेशाना मूठमाती मिळाली आहे. (प्रतिनिधी)


‘लोकमत’चा अंदाज खरा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १५ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. याबाबतचे दैनिक ‘लोकमत’ने रविवारी (दि.२३) ‘ऊस परिषद ठरणार उच्चांकी’ या मथळ्याखाली शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे वृत्त प्रसिद्ध केले होते.
या अनुषंगाने मंगळवारी (दि.२५) झालेल्या ऊस परिषदेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील शेतकरी उच्चांकी संख्येने उपस्थित राहिल्याने ‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला आहे.

Web Title: Crowds of Opponent's Oppression due to the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.