पूर पाहण्यासाठी राजाराम बंधाऱ्यावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:33+5:302021-07-25T04:22:33+5:30

गेल्या तीन-चार दिवसापासून पडत असलेल्या धुवाधार पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा ...

Crowds at Rajaram Dam to watch the floods | पूर पाहण्यासाठी राजाराम बंधाऱ्यावर गर्दी

पूर पाहण्यासाठी राजाराम बंधाऱ्यावर गर्दी

Next

गेल्या तीन-चार दिवसापासून पडत असलेल्या धुवाधार पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा पूर पाहण्यासाठी दत्तमंदिर घाट परिसरात वळवला. सहकुटुंब पूर पाहण्यासाठी नागरिकांनी येथे प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी वारंवार गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दी वाढतच चालली होती. नागरिकांनी दत्तमंदिर परिसर सोडून येथून निघून जावे. अन्यथा त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येईल, असे लाऊड स्पीकरवरून सांगण्यात येऊ लागल्यावर हळूहळू गर्दी कमी होऊ लागली.

दरम्यान, बावडा-शिये रोडवर पाणी आल्याने येथेही पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावून हा रस्ता पूर्णपणे बंद केला होता. मात्र तरीही नागरिक पूर पाहण्यासाठी येथे गर्दी करताना दिसत होते.

फोटो : २४ राजाराम बंधारा

राजाराम बंधारा दत्तमंदिर घाट येथे पूर पाहण्यासाठी शनिवारी नागरिकांनी एखाद्या जत्रेसारखी गर्दी केली होती.

(फोटो: रमेश पाटील,कसबा बावडा)

Web Title: Crowds at Rajaram Dam to watch the floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.