पावसातही खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:54+5:302021-06-17T04:16:54+5:30

कोल्हापूर : शहरातील बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी बुधवारी गर्दी राहिली. पावसातही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. लॉकडाऊन शिथिल केल्याने शहरात ...

Crowds for shopping even in the rain | पावसातही खरेदीसाठी गर्दी

पावसातही खरेदीसाठी गर्दी

Next

कोल्हापूर : शहरातील बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी बुधवारी गर्दी राहिली. पावसातही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. लॉकडाऊन शिथिल केल्याने शहरात गर्दी कायम राहिली. शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते. परिणामी वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.

लॉकडाऊन शिथिल केल्याने सकाळी सात ते दुपारी ४ पर्यंत अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, शिवाजी रोड, ताराबाई रोड, लुगडी ओळ, बिंदू चौक आदी ठिकाणी ग्राहकांची गर्दी झाली होती. रेनकोट, ताडपत्री, छत्री असे पावसाळी साहित्य तर बियाणे, खते खरेदीसाठी कृषिसेवा केंद्रात ग्राहकांची झुंबड उडाली होती.

फळ बाजारात सफरचंद, पेरू, अननस, पपई, संत्री, आब्यांची आवक चांगली झाली आहे. ते खरेदी करतानाही अनेक ग्राहक दिसत होते. विविध वस्तू खरेदीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारची जिल्हे आणि राज्यातूनही अनेक ग्राहक चारचाकी, दुचाकीवरून आले होते. यामुळे शहरातील पार्किंगची ठिकाणे सकाळच्या टप्प्यात फुल्ल झाली होती.

चौकट

निर्बंधांची कडक अंमलबजावणी हवेतच

शहर, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण बाजारपेठेत झालेली गर्दी आणि सामाजिक अंतराचा नियम काटेकोरपणे पाळण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. यामुळे कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीचा आदेश हवेतच विरल्याचे दिसून आले.

चौकट

रेशन दुकानांसमोर गर्दी

लॉकडाऊनमुळे सरकार सवलतीच्या दरात शिधापत्रिकेवर रेशन देत आहे. ते घेऊन जाण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात गर्दी होत आहे. शहरातील अनेक दुकानांसमोर रेशनधारकांची रांग लागली होती.

फोटो : १६०६२०२१- कोल- गर्दी

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारात पाऊस असतानाही खरेदीसाठी गर्दी झाली होती.

फोटो : नसीर अत्तार

Web Title: Crowds for shopping even in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.