CoronaVIrus Kolhapur : पावसातही खरेदीसाठी गर्दी, लॉकडाऊन शिथील केल्याने वर्दळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 PM2021-06-16T16:21:24+5:302021-06-16T16:26:12+5:30
CoronaVIrus Rain Kolhapur : कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी बुधवारी गर्दी राहिली. पावसातही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. लॉकडाऊन शिथील केल्याने शहरात गर्दी कायम राहिली. शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते. परिणामी वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.
कोल्हापूर : शहरातील बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी बुधवारी गर्दी राहिली. पावसातही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. लॉकडाऊन शिथील केल्याने शहरात गर्दी कायम राहिली. शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते. परिणामी वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.
लॉकडाऊन शिथील केल्याने सकाळी सात ते दुपारी ४ पर्यंत अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यामुळे लक्ष्मीपुरी, महाव्दार रोड, शिवाजी रोड, ताराबाई रोड, लुगडी ओळ, बिंदू चौक आदी ठिकाणी ग्राहकांची गर्दी झाली होती. रेनकोट, ताडपत्री, छत्री असे पावसाळी साहित्य तर बियाणे, खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात ग्राहकांची झुंबड उडाली होती.
फळ बाजारात सफरचंद, पेरू, अननस, पपई, संत्री, आब्यांची आवक चांगली झाली आहे. ते खरेदी करतानाही अनेक ग्राहक दिसत होते. विविध वस्तू खरेदीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारची जिल्हे आणि राज्यातूनही अनेक ग्राहक चारचाकी, दुचाकीवरून आले होते. यामुळे शहरातील पार्किंगची ठिकाणे सकाळच्या टप्यात फुल्ल झाली होती.