चांगुलपणाच्या संस्काराचे अनुकरण व्हावे : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 06:39 PM2021-07-14T18:39:40+5:302021-07-14T18:44:24+5:30
CoronaVirus Kolhapur Bjp : ज्यातून कसे सुटायचे हे माहिती नसणारे कोरोनाचे संकट जगावर आले. या काळात कोल्हापुरात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी चांगुलपणाचा संस्कार काय असतो हे दाखवून दिले. त्यांच्यावरील या संस्काराचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर : ज्यातून कसे सुटायचे हे माहिती नसणारे कोरोनाचे संकट जगावर आले. या काळात कोल्हापुरात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी चांगुलपणाचा संस्कार काय असतो हे दाखवून दिले. त्यांच्यावरील या संस्काराचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
अभिमान कोल्हापूरचा अभियानांतर्गत गायन समाज देवल क्लब येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. कोरोनाकाळात शहरातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांनी विविध प्रकारचे सामाजिक कार्य केले. अशांविषयी या वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भाजपच्यावतीने कृतज्ञता पत्र आणि सन्माचिन्ह देऊन या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रास्ताविक केले. भाजपची या उपक्रमामागील भूमिका विशद केली. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. ते म्हणाले, समाजच समाजासाठी कसे काम करतो हे या काळात पहावयास मिळाले. या सर्वांपासून प्रेरणा घेऊन आणखी कार्यकर्ते तयार व्हावेत आणि समाजातील दीन-दुबळ्यांना त्यांची मदत व्हावी, हीच या कार्यक्रमातून अपेक्षा आहे.
या वेळी जाफरबाबा, प्रिया दंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, महेश जाधव, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...यांचा झाला सन्मान
मिलिंद धोंड, जयेश ओसवाल, उमेश यादव, प्रिया दंडगे, शुभांगी थोरात, हर्षल सुर्वे, प्रिया पाटील (भवानी फाउंडेशन), विराज सरनाईक (कर्तृत्व सामाजिक संस्था), अशोक देसाई (हिंदू युवा प्रतिष्ठान), अशोक रोकडे (व्हाईट आर्मी), ऐश्वर्या मुनिश्वर (सेवा निलायम), संताजी घोरपडे, डॉ. संगीता निंबाळकर, राजू मेवेकरी (महालक्ष्मी अन्नछत्र), अवधूत भाट्ये (द नेशन फस्ट), रवी जावळे (माणुसकी फाउंडेशन), संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे (सेवाव्रत प्रतिष्ठान), हिल रायडर्स (प्रमोद पाटील), जाफरबाबा (बैतुलमाल कमिटी), रॉबिनहूड आर्मी, पोलीस कर्मचारी भगवान गिरीगोसावी, निवास पाटील, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, चारुदत्त जोशी.