महापालिका हद्दीत रात्री अकरा ते सहा संचारबंदी, महापालिकेकडून पथकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 07:45 PM2020-12-22T19:45:49+5:302020-12-22T19:56:25+5:30

CoronaVirusUnlock kolhapur- परदेशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Curfew from 11 pm to 6 pm within the municipal limits - Appointment of teams by the Municipal Corporation | महापालिका हद्दीत रात्री अकरा ते सहा संचारबंदी, महापालिकेकडून पथकांची नियुक्ती

महापालिका हद्दीत रात्री अकरा ते सहा संचारबंदी, महापालिकेकडून पथकांची नियुक्ती

Next
ठळक मुद्देमहापालिका हद्दीत रात्री अकरा ते सहा संचारबंदीमहापालिकेकडून पथकांची नियुक्ती

कोल्हापूर : परदेशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश सोमवारी दिले. या संदर्भात महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेची पथके तयार केली असून पथकातील कर्मचारी या काळात गस्त घालणार आहेत.

परदेशात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून तेथे पुन्हा या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन अंतर्गत पुन्हा काही बंधने घातली आहेत. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत ख्रिसमसच्या सुट्या आणि ३१ डिसेंबर येत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची व कोरोना संसर्गाची भीती आहे.

त्यामुळे खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

Web Title: Curfew from 11 pm to 6 pm within the municipal limits - Appointment of teams by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.