राजकीय पक्षांच्या उमेदवारीबाबत उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:32+5:302021-01-08T05:13:32+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना पक्षीय उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. कोणत्या पक्षाची उमेदवारी ...
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना पक्षीय उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे, तर इच्छुकांनी आपणास अमूक एका पक्षाची उमेदवारी मिळणार असे गृहित धरून प्रचारासही सुरुवात केली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर होऊ लागल्यापासून सर्वच उमेदवारांचा कल राजकीय पक्षांची उमेदवारी घेण्याकडे आहे. अपक्ष लढल्याने ताकद लागत नाही याची जाणीव उमेदवारांना आहे. पक्षाकडून निवडणूक निधी मिळतो आणि सर्वप्रकारची यंत्रणा उपलब्ध होते त्यामुळे कोणत्याही पक्षाची उमेदवारी असो ती घेण्याचा उमेदवारांचा आग्रह दिसतो.
प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याकडे अनेकांचा ओढा आहे. गेल्या सभागृहात शिवसेना, ताराराणी आघाडीची उमेदवारी घेतलेले उमेदवार, नगरसेवकदेखील आता दोन्ही काँग्रेसकडे आकृष्ट झालेले पाहायला मिळतात. दोन्ही काँग्रेसना उमेदवारांची कमतरता भासलेली नाही. एक-एका प्रभागात दोन-तीन इच्छुक आहेत. त्याला राज्यातील सत्ता कारणीभूत आहे.
भाजप व ताराराणी आघाडीकडेही उमेदवारी मागण्यास इच्छुक पुढे आले आहेत. भाजप पस्तीस ते चाळीस तर ताराराणी चाळीस ते पंचेचाळीस ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. दोन्ही पक्षांकडून सक्षम उमेदवार व प्रभागांबाबत आढावा घेतला जात आहे. शिवसेनेने सर्वच जागा लढविण्याचा निर्धार केला आहे.
राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवार -
राष्ट्रीय काँग्रेस - शारंगधर देशमुख - सानेगुरुजी वसाहत, अर्पिता अर्जुन माने - नागाळा पार्क, जयश्री सचिन चव्हाण - नाथागोळे तालीम, भूपाल शेटे - सुभाषनगर, दुर्वास कदम, कळंबा फिल्टर हाऊस, आश्किन आजरेकर - कॉमर्स कॉलेज, प्रवीण सोनवणे - बुद्धगार्डन, सुनंदा संभाजी जाधव- मंगेशकरनगर, इंद्रजित बोंद्रे - चंद्रेश्वर, धीरज पाटील - साळोखेनगर, श्रीकांत बनछोडे- बाजारगेट, दिग्विजय किंवा दीपा मगदूम - राजलक्ष्मीनगर, अजय इंगवले- फिरंगाई.
राष्ट्रवादी काँग्रेस - आदिल फरास - महालक्ष्मी मंदिर, वैष्णवी आकाश कवाळे -राजारामपुरी, महेश सावंत - राजलक्ष्मीनगर, अर्चना उत्तम कोराणे- पद्माराजे उद्यान, सुनीता अजित राऊत - संभाजीनगर बसस्थानक, रमेश पोवार - ट्रेझरी, ॲड. सूरमंजिरी लाटकर - शाहू कॉलेज, प्रकाश गवंडी - पंचगंगा तालीम.
भाजप- अजित ठाणेकर - महालक्ष्मी मंदिर, अभय तेंडुलकर - साळोखेनगर, अरुण धरपणकर-पाटील - पंचगंगा तालीम, अतुल चव्हाण - ट्रेझरी, संजय सावंत - सानेगुरुजी, चंद्रकांत घाटगे - पोलीस लाईन, अमर भालकर -टाकाळा खण माळी कॉलनी, माधुरी किरण नकाते - संभाजीनगर, पूजा अजिंक्य चव्हाण - पद्माराजे उद्यान
ताराराणी आघाडी - सत्यजित कदम - कदमवाडी, वैभव माने - भोसलेवाडी कदमवाडी, मारुती माने - सदर बाजार, रियाज सुभेदार -ट्रेझरी,
जनसुराज्य शक्ती पक्ष - मुरलीधर जाधव.
शिवसेना - रविकिरण इंगवले- फिरंगाई, स्नेहल राहुल चव्हाण