प्रतिभानगरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:32+5:302021-03-19T04:22:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर उच्चभ्रू वसाहत आणि झोपडपट्टी अशी मिश्र वस्ती असलेल्या प्रतिभानगर या ...

Curiosity of NCP and Shiv Sena candidates in Pratibhanagar | प्रतिभानगरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता

प्रतिभानगरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर उच्चभ्रू वसाहत आणि झोपडपट्टी अशी मिश्र वस्ती असलेल्या प्रतिभानगर या ४१ क्रमांकाच्या प्रभागामधून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेसकडून विद्यमान नगरसेविका छाया उमेश पोवार यांना पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास आहे. हा प्रभाग यंदाही सर्वसाधारण महिला असाच राहिला आहे. या घरात दहा वर्षे नगरसेवकपद राहिले आहे. या काळात जे काम केले आहे त्या जोरावर पुन्हा एकदा त्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या छाया पोवार यांनी राष्ट्रवादीच्या पदमावती काकासाहेब पाटील यांचा पराभव केला होता. तर ताराराणी आघाडीच्या कविता पाटगावकर या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. पाटील यांचा १६३ तर कविता पाटगावकर यांचा २०६ मतांनी पराभव झाला. छाया पाेवार यांचे सासरे देवाप्पा हे देखील याआधी या प्रभागातून निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवलेल्या पदमावती यांचे पती काकासाहेब पाटील हे पांजरपोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याने राष्ट्रवादीला या ठिकाणी अन्य उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

मराठा महासंघाच्या माध्यमातून कार्यरत असणारे अवधूत पाटील यांच्या पत्नी सारिका या येथून इच्छूक आहेत. गेली अनेक वर्षे अवधूत महासंघाचे आघाडीचे कार्यकर्ते असल्याने त्याचा फायदा होईल, असा त्यांना विश्वास आहे. शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत इच्छुक आहेत. कोरोना काळातील त्यांनी केलेल्या कामगिरीवर त्यांचा विश्वास आहे. प्रभागातील अनेक कामे मार्गी लागण्याची गरज त्या व्यक्त करतात. रोहित पवार यांच्या पत्नी अपर्णा यादेखील या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. रोहित पोवार यांचा पारंपरिक मतदारसंघ पांजरपोळ आहे. तेथून ते इच्छुक आहेत; मात्र प्रतिभानगर मतदारसंघातील वडर समाजाची संख्या अधिक असल्याने पत्नी अर्पणा यांना रिंगणात उतरवण्याचा त्यांचा मानस आहे; मात्र त्यांचा पक्ष अजूनही ठरलेला नाही. कविता पाटगावकर या येथून पुन्हा एकदा ताराराणी आघाडीच्या उमेदवार होऊ शकतात. या प्रभागामध्ये निवडणूकपूर्व शांतता असून, जो तो अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मिश्र वस्तीचा हा प्रभाग असल्याने येथील प्रश्नही वेगवेगळे आहेत. अजूनही निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने अनेक जण आपले पत्ते खोलत नसल्याचेही दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक ४१

प्रतिभानगर

विद्यमान नगरसेविका

छाया उमेश पोवार

आताचे आरक्षण

सर्वसाधारण महिला

गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...

सविता मातीवड्डर हिंदू महासभा २१

कविता पाटगावकर ताराराणी आघाडी १२६२

पदमावती पाटील राष्ट्रवादी काँग्रेस १३१५

छाया पोवार काँग्रेस १४७८

सुनीता राऊत अपक्ष २८

नीता उदाळे शिवसेना ८९

कोट

प्रभागातील ८० टक्क्यांहून अधिक रस्त्यांची कामे झाली आहेत. झोपडपट्टी विभागातील तांत्रिक अडचणींमुळे वगळता अन्यत्र ड्रेनेजची आवश्यक ती सर्व कामे केली आहेत. मतदारसंघातील ४०० कुटुंबांना शौचालयाचे साहित्य पुरवले आहे आणि महानगरपालिकेच्या निधीतून त्याची जोडणीही केली आहे. सातत्याने संपर्क आणि प्रभागातील प्रश्न सोडवणुकीसाठी गेल्या पाच वर्षात काम केले आहे.

छाया पाेवार

विद्यमान नगरसेविका

ही झाली आहेत कामे..

प्रभागातील जगदाळे कॉलनी, दत्त गल्लीसह अन्य आवश्यक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण. ड्रेनेजच्या पाइपलाइन्स ज्या ठिकाणी बदलण्याची गरज आहे, त्या बदलल्या आहेत. दोन उद्यानांमध्ये ओपन जीम उभारण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांच्या महापालिका निधीतून जोडण्या केल्या आहेत.

हे आहेत प्रश्न..

झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न आहे. कचरा उठाव वेळेत न होणे, गटारं तुंबली आहेत, यासाठी मुकादमांना सारखा फोन करावा लागतो. प्रभागात मैदान, ज्येष्ठांसाठी नाना-नानी पार्क आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.

१८०३२०२१ कोल प्रतिभानगर ०१/०२

प्रतिभानगर प्रभागामध्ये अशा पद्धतीने ओपन जीम उभारण्यात आले आहेत; मात्र पाच वर्षे झाली तरी कॉ. गोविंद पानसरे यांचे स्मारक मात्र अपूर्ण राहिले आहे.

Web Title: Curiosity of NCP and Shiv Sena candidates in Pratibhanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.