येस बँकेत ग्राहकांच्या रांगा, एटीएम सेंटरसमोरही गर्दी : ग्राहकांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:35 PM2020-03-07T18:35:37+5:302020-03-07T18:40:39+5:30
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शाखेमध्ये तसेच एटीएम सेंटरसमोर पैसे काढण्यासाठी शनिवारी रांगा लागल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्यामुळे कावळा नाका, लक्ष्मीपूरी येथील शाखेत गर्दी झाली होती.
कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शाखेमध्ये तसेच एटीएम सेंटरसमोर पैसे काढण्यासाठी शनिवारी रांगा लागल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्यामुळे कावळा नाका, लक्ष्मीपूरी येथील शाखेत गर्दी झाली होती.
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकेतील कारभारावर करडी नजर ठेवली आहे. व्यवहारामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित बँकांवर थेट निर्बंध आणले जात आहे.
पीएमसी बँकेवरील कारवाई ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी खासगी क्षेत्रातील येस बँकेवरही निर्बंध घालण्यात आले. महिन्यांत केवळ ५0 हजार रुपये काढता येणार आहेत. यामुळे ग्राहकांनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे. कोल्हापूर शहरामधील दोन्ही शाखेत हीच स्थिती आहे.