राष्ट्रीय महामार्गावरील जीर्ण व धोकादायक झाडे तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:39+5:302021-06-24T04:17:39+5:30
मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये अशी धोकादायक व जीर्ण झालेली ...
मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात देण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये अशी धोकादायक व जीर्ण झालेली झाडे तोडली होती. त्यानंतर हा रस्ता सध्या नॅशनल हायवे अॅथॉरिटीकडे वर्ग झाला आहे. संबंधित विभागाचे कार्यालय आज-यात नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याची जबाबदारी घेण्यास तयार नाही.
चार दिवसांपूर्वी गडहिंग्लज येथे धोकादायक वृक्ष कोसळून आजी व नातू यांना जीव गमवावा लागला आहे. अशा घटना आजरा तालुक्यात घडू नयेत. यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या अधिका-यांना धोकादायक व जीर्ण झाडे हटविण्याचे आदेश करावेत.
येत्या १५ दिवसात संबंधित वृक्ष न तोडल्यास आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करावे लागले, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
नायब तहसीलदार संजय इळके यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अनिल निऊंगरे, आनंदा घंटे, सरिता सावंत, प्रकाश कांबळे, वसंत घाटगे, चंद्रकांत सांबरेकर, पूनम भादवणकर, कुणाल पोतदार, अर्चना वंजारी यांचा समावेश होता.
फोटो ओळी : भादवणवाडी ते घाटकरवाडी राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व जीर्ण वृक्ष तोडावेत या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय इळके यांना देताना अनिल निऊंगरे, आनंदा घंटे, सरिता सावंत आदी उपस्थित होते.
क्रमांक : २३०६२०२१-गड-०५