विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्याने अकरावीचा ‘कटऑफ’ घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:15+5:302021-09-08T04:29:15+5:30
पहिल्या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रवेश समितीने ‘एसएमएस’द्वारे दिली. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळाला नाही, त्यांनाही ...
पहिल्या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रवेश समितीने ‘एसएमएस’द्वारे दिली. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळाला नाही, त्यांनाही त्याबाबतचा एसएमएस पाठविण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयांनी दुपारी एकच्या सुमारास नोटीस बोर्डवरही निवड यादी लावली. ती पाहण्यास विद्यार्थी, पालकांनी भरपावसात महाविद्यालयात उपस्थिती लावली.
तक्रार करा ऑनलाईन
विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाच्या निवडीबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करावी.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
समितीकडे दाखल अर्ज : ९८१०
छाननीत अपात्र ठरलेले अर्ज : ८४
प्रवेशासाठी पात्र अर्ज : ९७२६
व्यवस्थापन कोट्याअंतर्गत प्रवेश : ३६६
पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेले विद्यार्थी : ७३५६
दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेले विद्यार्थी : २००४
विद्याशाखानिहाय कटऑफ
विज्ञान : ९२ टक्के
वाणिज्य (इंग्रजी) : ९२.४०
वाणिज्य (मराठी) : ७९.६०
कला (मराठी) : ७२.६०
कला (इंग्रजी) : ६६.४०
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१)मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला
२)आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला
३) आधारकार्डच्या दोन छायांकित प्रती आणि दोन छायाचित्रे
४) विद्यार्थिनींसाठी प्रतिज्ञापत्र
फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली. (छाया : नसीर अत्तार)
070921\07kol_1_07092021_5.jpg~070921\07kol_2_07092021_5.jpg~070921\07kol_3_07092021_5.jpg
फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली. (छाया : नसीर अत्तार)