विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्याने अकरावीचा ‘कटऑफ’ घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:21+5:302021-09-08T04:29:21+5:30
गुणवत्ता, प्राधान्यक्रम, आरक्षण आणि शासन निर्देशानुसार निवड यादी प्रसिद्ध केली. त्याबाबतची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी ...
गुणवत्ता, प्राधान्यक्रम, आरक्षण आणि शासन निर्देशानुसार निवड यादी प्रसिद्ध केली. त्याबाबतची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष रामाणे, राजेंद्र कोळेकर उपस्थित होते. विज्ञान, वाणिज्य आणि कला (मराठी, इंग्रजी माध्यम) विद्याशाखांची एकूण प्रवेश क्षमता १४६८० आहे. त्यावरील प्रवेशासाठी ९८१० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. छाननीत ८४ अर्ज अपात्र ठरले. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या ९७२६ विद्यार्थ्यांपैकी ७३५६ जणांची पहिल्या फेरीत निवड झाली आहे. त्यांनी आज, बुधवार ते दि.१५ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. उर्वरित २००४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार आहे.
चौकट
राजाराम कॉलेज, डीआरके, न्यू कॉलेजची आघाडी
अनुदानित विज्ञान शाखेतील कटऑफमध्ये राजाराम कॉलेज ९२ टक्क्यांसह पहिल्या,तर विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज ९१.२० दुसऱ्या क्रमाकांवर आहे. वाणिज्य इंग्रजीमध्ये डीआरके कॉमर्स कॉलेज ९२.४० टक्क्यांनी प्रथम, तर विवेकानंद कॉलेज ८८.४० टक्क्यांनी द्वितीयस्थानी आहे. वाणिज्य मराठीत न्यू कॉलेज ७९.६० टक्क्यांनी पहिल्या, विवेकानंद आणि डीआरके कॉमर्स कॉलेज ७७.२० टक्क्यांनी दुसऱ्या आणि कला मराठीमध्ये न्यू कॉलेज ७२.६० टक्क्यांसह प्रथम, तर नाईट कॉलेज ७२.२० टक्क्यांनी द्वितीय क्रमाकांवर आहे.