सायबर फसवणूक झाली, त्वरित संपर्क साधा हेल्पलाईन नंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:18+5:302021-07-02T04:17:18+5:30

कोल्हापूर : ऑनलाईन फसवणुकीमधील तक्रारदाराचे बँक खाते रिकामे होण्यापासून किंवा इतर हानी टाळण्यासाठी फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस हेल्पलाईन ...

Cyber fraud occurred, contact the helpline number immediately | सायबर फसवणूक झाली, त्वरित संपर्क साधा हेल्पलाईन नंबरला

सायबर फसवणूक झाली, त्वरित संपर्क साधा हेल्पलाईन नंबरला

कोल्हापूर : ऑनलाईन फसवणुकीमधील तक्रारदाराचे बँक खाते रिकामे होण्यापासून किंवा इतर हानी टाळण्यासाठी फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस हेल्पलाईन ८४१२८४११०० या नंबरवर संपर्क साधा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. अधीक्षक बलकवडे यांच्याच अभिनव संकल्पनेतून सायबर तक्रारीकरिता हा मोबाईल नंबर गुरुवारपासून कार्यान्वित केला.

नागरिकांना त्यांच्याबाबत घडलेल्या सायबर गुन्ह्यासंबधी ऐनवेळी काय करावे हेच कळत नाही. फसवणूक झाली म्हणून ते संबंधित कंपन्यांचे गुगलवरून कॉलसेंटर अगर कस्टमर केअरचा नंबर शोधून तक्रार करतात; पण त्यातही फसवणूक होते. सायबर फसवणूक, गुन्हेबाबतची तक्रार सुलभेतेने पोलिसांत देता यावी. ऑनलाईन फसवणुकीमधील तक्रारी देण्यास गेल्यावर तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व तक्रारदार यांच्यात समन्वय राहावा, यासाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला.

सर्वसामान्यांना पोलिसांमध्ये तक्रार सुलभतेने देता यावी, लोकाभिमुख पोलिसिंगची अंमलबजावणी प्रभावी व्हावी, यासाठी कोल्हापूर पोलीस दल हायटेक होण्याच्या मार्गावर असून, त्याचाच भाग म्हणून नागरिकांसाठी ऑनलाईन स्वरूपात इन्स्टाग्रामवर- kolhaprupolice , फेसबुकवर- KolhapruPolice आणि टि्‌टरवर @KOLHAPRU_POLICE असे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोल्हापूर पोलिसांशी समन्वय साधू शकतात.

स्वतंत्र पथकाची निर्मिती

सध्या कोल्हापूर पोलीस दलाचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटची हाताळणीकरिता सायबर पोलीस ठाण्याकडून विशेष पथकाची निर्मिती केली आहे.

४० स्मार्टफोन शोधले

वर्षभरात ज्या लोकांचे स्मार्टफोन गहाळ झाले होत, अशा विविध कंपन्यांचे ४० स्मार्टफोन शोधण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून, त्यापैकी १० स्मार्टफोन मालकांचा शोध घेऊन त्यांना अधीक्षक बलकवडे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले.

फोटो नं. ०१०७२०२१-कोल-सायबर०१

ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्या सायबर पोलीस पथकाने तांत्रिक माहितीद्वारे शोधलेले स्मार्ट फोन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते संबंधित मालकांना दिले. या वेळी सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकांत कंकाळ, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक साहील झरकर उपस्थित होते.

010721\01kol_7_01072021_5.jpg

ओळ : कोल्हापूर पोलिस दलाच्या सायबर पोलीस पथकाने तांत्रिक माहितीद्वारे शोधलेले स्मार्ट फोन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते संबधीत मालकांना दिले.  यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकांत कंकाळ, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक साहील झरकर उपस्थित होते.

Web Title: Cyber fraud occurred, contact the helpline number immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.