राधानगरीत काॅंग्रेसच्यावतीने महागाईविरोधात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:10+5:302021-07-16T04:17:10+5:30
केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राधानगरी तालुका काॅंग्रेस (आय) पक्षाच्यावतीने घोटवडे ते आमजाई व्हरवडे अशी सायकल रॅली काढण्यात आली. ...
केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राधानगरी तालुका काॅंग्रेस (आय) पक्षाच्यावतीने घोटवडे ते आमजाई व्हरवडे अशी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. काही लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असला, तरी महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोटय़वधी गोरगरीब जनतेने, शेतकऱ्यांनी कसे जगायचे असा सवाल यावेळी विचारण्यात आला. कौलव-घोटवडे येथून या सायकल रॅलीला सुरुवात आणि आमजाई व्हरवडे येथे सांगता करण्यात आली. यावेळी राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगुले, भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, राधानगरी काँग्रेस समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, ए.डी.पाटील, धीरज डोंगळे, रवी पाटील, विजयसिंह मोरे, सरपंच सुभाष पाटील, शहाजी कवडे, रवींद्र पाटील, बी.आर.पाटील, उमर पाटील, युवा नेते सुनील चौगले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१५ राधानगरी काँग्रेस रॅली
फोटो ओळी :
राधानगरी तालुका काॅंग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करताना भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, सुशील पाटील, धीरज डोंगळे, हिंदुराव चौगले व कार्यकर्ते