दुर्गम विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम-जीवनधारा ब्लड बॅँकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:16 AM2019-03-20T01:16:33+5:302019-03-20T01:17:19+5:30

शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे.

'Cycle-recycle' initiative for remote students - Vitalyada Blood Bank initiative | दुर्गम विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम-जीवनधारा ब्लड बॅँकेचा पुढाकार

दुर्गम विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम-जीवनधारा ब्लड बॅँकेचा पुढाकार

Next
ठळक मुद्देशाहूवाडी, गगनबावडा, राधानगरीतील ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या वापरलेल्या सायकली घेऊन, त्याची दुरुस्ती करून त्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार असून, यामध्ये किमान ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

शहरात तंत्रज्ञानाचा वापर, वाहतुकीच्या सहज सुविधा, वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते. शहरे व सधन तालुक्यात विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये घेऊन जाण्यासाठी बसेस थेट दारात येतात; पण याउलट दुर्गम, वाड्या वस्त्यांवरील चित्र आहे. विशेषत: शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी परिसरातील दुर्गम खेड्यापाड्यातील मुलामुलींनी ४- ५ किलोमीटर पायपीट करावी लागते. जिथे वाहतुकीची व्यवस्था, तिथे तासन्तास वाहनांची वाट पाहत उभे राहावे लागते. जिथे सुविधाच नाहीत तिथे पायपीट करत ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मदत करण्याची भूमिका जीवनधारा ब्लड बॅँकेचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. यामध्ये उमेद फौंडेशन, सांगरूळ, तसेच फ्रेंडस अकॅडमी, कोल्हापूरचे कार्यकर्तेही सक्रिय होत आहेत.
सधन कुटुंबातील मुलांना लहानपणापासूनच सायकलीचे लाड पुरविले जातात. मुले जशी मोठी होत जातील, तशा या सायकली बदलत जाऊन, अडगळीत पडल्या जातात. या सायकली घ्यायची, त्याची दुरुस्ती करून त्या गरजू विद्यार्थ्यांना देण्याची संकल्पना प्रकाश घुंगूरकर यांनी मांडली. वापर नसलेल्या, मोडकळीस आलेल्या सायकली या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन घुंगूरकर यांनी केले आहे. या सायकली दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना वापरासाठी देण्यात येणार आहेत.

संबंधित विद्यार्थ्यांची गरज संपल्यानंतर ही सायकल परत करायची आणि ती दुरुस्त करून पुन्हा गरजू विद्यार्थ्यांना वापरासाठी देण्यात येणार आहे. अशाप्रकारे सायकल रिसायकलचे चक्र सुरू ठेवण्याचा मानस प्रकाश घुंगूरकर यांनी केला आहे. त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून, ही चळवळ व्यापक करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याच्या प्रयत्नाचे समाजातून कौतुक होत आहे.

मुंबईतून १५ सायकली जमा
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहेच; त्याशिवाय मुंबईतील पंधराहून अधिक पालकांनी सायकली देण्याची तयारी दर्शवली आहे.

या भागातून होते  सायकलची मागणी
अनुस्कुरा, बर्की, वाकीचा धनगरवाडा, गवशी, गावठाण, धुंदवडे, गगनबावडा.

 

ब्लड बॅँकेच्या कॅम्पसाठी शाहूवाडी तालुक्यात गेल्यानंतर विद्यार्थ्यांची पायपीट पाहिली. त्यातून ही संकल्पना सूचली असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रकाश घुंगूरकर, अध्यक्ष, जीवनधारा ब्लड बॅँक

Web Title: 'Cycle-recycle' initiative for remote students - Vitalyada Blood Bank initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.