‘ग्रीन कोल्हापूर’साठी रविवारी सायकल राईड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:28 AM2018-11-20T00:28:38+5:302018-11-20T00:28:43+5:30

कोल्हापूर : आपलं कोल्हापूर कचरामुक्त आणि खऱ्या अर्थाने ग्रीन करण्यासाठी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे शहर ...

Cycle ride on Sunday for 'Green Kolhapur' | ‘ग्रीन कोल्हापूर’साठी रविवारी सायकल राईड

‘ग्रीन कोल्हापूर’साठी रविवारी सायकल राईड

Next

कोल्हापूर : आपलं कोल्हापूर कचरामुक्त आणि खऱ्या अर्थाने ग्रीन करण्यासाठी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ रविवारी (दि. २५) सकाळी साडेसहा वाजता आयोजित केली आहे. या राईडमध्ये सहभागी होऊन या पर्यावरणपूरक उपक्रमाला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी.
‘लोकमत’ नेहमीच कोल्हापूरसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविते. त्याअंतर्गत आता ‘कचरामुक्त आणि ग्रीन कोल्हापूर’ची साद दिली आहे. ‘लोकमत’ने ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ आयोजित केली आहे.
ही राईड रविवारी (दि. २५) सकाळी साडेदहा वाजता हॉटेल सयाजीमधील साज लॉनपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ५० रुपये, तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यामध्ये सहभागी होणाºया प्रत्येकाला सायकल फ्लॅग, बीब नंबर, नाष्टा, एनर्जी ड्रिंक आणि सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.
राईडची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा वर्कआऊट सेशनदेखील होणार आहे. या राईडचे प्रायोजक हॉटेल सयाजी, तर सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह आहे, तर नॉर्थस्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ‘डीवायपी’ वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, रेडिओ मिर्ची, दोशी सायकल, कोल्हापूर स्पोर्टस् क्लब, एक्स्पोलर कोल्हापूर आणि कोल्हापूर सायकलिंग क्लब यांचे सहकार्य लाभले आहे. या राईडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कोल्हापुरात पहिल्यांदाच आयोजन
अशा स्वरूपातील सायकल राईड या अधिकतर मुंबई, बंगलोर, पुणे, आदी मेट्रोसिटीमध्ये आयोजित केल्या जातात. मात्र, ‘लोकमत’ने पहिल्यांदाच कोल्हापुरात ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ आयोजित करून शहरवासीयांना एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे.
सायकल राईडचा मार्ग असा
हॉटेल सयाजी साज लॉन, टेंबलाई उड्डाणपूल, केएसबीपी पार्क, शाहू टोलनाका, शिवाजी विद्यापीठ कॅम्पस ते पुन्हा टेंबलाई केएसपीबी पार्क, टेंबलाई उड्डाणपूल, हॉटेल सयाजी असा या सायकल राईडचा मार्ग आहे.
आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी
या सायकल राईडनिमित्त ‘बेस्ट स्लोगन’, ‘बेस्ट ड्रेसअप’, ‘बेस्ट सायकलिस्ट’ आणि जास्तीत जास्त सहभाग ग्रुप नोंदणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यातील विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि बक्षिसे मिळणार आहेत.
या राईडमधील सहभागासाठी नावनोंदणीकरिता ‘लोकमत’ शहर कार्यालय, ‘डीवायपी सिटी’, राजारामपुरीतील दोशी सायकल अथवा (९६०४६४४४९४/ ७९७२३९२०२५) या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Web Title: Cycle ride on Sunday for 'Green Kolhapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.