सायरस पूनावाला स्कूलची फी चार वर्षे जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:45 AM2021-02-28T04:45:39+5:302021-02-28T04:45:39+5:30
पेठवडगाव : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आहे. याची दखल सायरस पूनावाला स्कूलने शैक्षणिक फी ...
पेठवडगाव : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आहे. याची दखल सायरस पूनावाला स्कूलने शैक्षणिक फी मध्ये फी कपात करीत चार वर्षे फी जैसे थी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती सायरस पूनावाला स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोळ म्हणाल्या, पूनावाला स्कूल विद्यार्थी व पालक हा केंद्रबिंदू मानून काम करीत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्याचा आर्थिक, सामाजिक परिणाम झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपत आर्थिक स्थितीचा विचार करून शैक्षणिक फी, पूर्व प्राथमिक व वसतिगृह शुल्कामध्येही कपात करून वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांची घोषणा शिक्षक, पालक सभेत करण्यात आली. २०२३ ते २०२४ या शैक्षणिक वर्षापर्यंत शुल्कात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले.
शिक्षक, पालक सभेत अध्यक्ष गुलाबराव पोळ, संचालक डाॅ. सरदार जाधव, प्राचार्य मारुती कामत, डाॅ. माधवी सावंत, श्रद्धा पारेख, राकेश माळी, आदी उपस्थित होते.