सायरस पुनावाला स्कूलमध्ये शाहू जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:15+5:302021-06-27T04:17:15+5:30
पेठवडगाव : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाहू जयंती ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. राजर्षी ...
पेठवडगाव :
येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाहू जयंती ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे ऑनलाइन पूजन करण्यात आले. स्कूलच्या शिक्षिका भैरवी भोसले यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.
शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कला आणि क्रीडाविषयक कार्य, शेतकरी आणि शेतीच्या अनुषंगाने त्यांची दूरदृष्टी, कल्याणकारी राजकारभाराची माहिती क्षितिज जाधव, सेजल गवळी, साईराज तवंदकर यांनी दिली. तर सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट गीते, पोवाडा आणि नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आला. यावेळी शाहू महाराज यांच्या शाहू मैदान, राधानगरी धरण, कुस्ती संकुले, शेतकरी वर्गासाठी केलेले कार्यही ऑनलाइन पद्धतीने दाखविण्यात आले. सूत्रसंचालन आदित्य उलपे यांनी केले. यूट्यूब वरून झालेल्या लाईव्ह कार्यक्रमात सहाशेहून अधिक पालक, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. जयंती कार्यक्रमासाठी स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव, समुपदेशिका डॉ. माधवी सावंत, सागर फरांदे, मीनल पाटील आदी उपस्थित होते.