डी. सी. नरके स्कूलची हॅट्ट्रिक

By admin | Published: October 8, 2015 12:12 AM2015-10-08T00:12:57+5:302015-10-08T00:32:55+5:30

१७ वर्षांखालील जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा : मुलींत न्यू इंग्लिश स्कूल, नूल संघ विजयी

D. C. Hatchet of hell school | डी. सी. नरके स्कूलची हॅट्ट्रिक

डी. सी. नरके स्कूलची हॅट्ट्रिक

Next

कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने आयोजित १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत मुलांमध्ये डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे संघाने, तर मुलींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल नूल संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघांना तहसीलदार हणमंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
मुलांच्या अंतिम सामन्यात डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे संघाने पन्हाळा पब्लिक, पन्हाळा संघावर २-० गोल फरकाने मात केली. यामध्ये कुडित्रेकडून धीरज बारडे व केतन जावळेने गोल केला.
विजयी संघात ऋतुराज पाटील, तेजस पडवळ, ऋत्विक भिके, अमित पाटील, अथर्व देसाई, करण राऊत, विवेक महाडेश्वर, आशुतोष बुगड, स्वराज चौगले, केतन जावळे, धीरज बारडे, आशुतोष पाटील, राजवर्धन पाटील, आविष्कार पाटील, आदिनाथ पाटील, अमोल सुतार, पृथ्वीराज भोसले, ऋषिकेश पाटील यांचा सहभाग होता.
प्रशिक्षक म्हणून शिवाजी डुबल, सागर जाधव, उदय पवार, सागर पोवाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मुलींच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल, नूल संघाने ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन, वडणगे संघावर २-०ने मात केली. यामध्ये पूजा मगदूम व प्रीती माने यांनी गोल केले. विजयी संघात स्वाती चौगुले, गीतांजली पाटील, अश्विनी चौगुले, गीता माने, प्रीती माने, आरती गवळी, अश्विनी हिरेमठ, पूजा मगदूम, हर्षदा चव्हाण, कावेरी पाटील, रूपाली थोरात, स्नेहल हिरेमठ, रोहिणी कांबळे, योगिता कुलकर्णी, प्राजक्ता शिंदे यांचा सहभाग होता.
स्पर्धेत पंच म्हणून अनुप जाधव, ओंकार भांडवले, गणेश पोवार, योगेश माने यांनी काम पाहिले. बक्षीस वितरणप्रसंगी शासकीय प्रशिक्षक उदय पवार, राष्ट्रीय फुटबॉलपटू चिंटू खोत, आदी उपस्थित होते.

Web Title: D. C. Hatchet of hell school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.