डी. सी. नरके सर्वसामान्यांचे आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:42 AM2021-02-18T04:42:04+5:302021-02-18T04:42:04+5:30
कोपार्डे : सर्वसामान्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढील काळाचा विचार करून साखर कारखाना, बँक, शिक्षण संस्था उभ्या करून कृषी व्यवसायाला गती ...
कोपार्डे : सर्वसामान्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढील काळाचा विचार करून साखर कारखाना, बँक, शिक्षण संस्था उभ्या करून कृषी व्यवसायाला गती देण्याचे काम डी. सी. नरके यांनी केले. यामुळेच त्यांना सर्वसामान्यांचा आधारवड संबोधले जाते, असे मत मा. आ. व कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले.
बुधवारी कुंभी कासारी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील डी. सी. नरके यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तसेच कुंभी बँकेच्या मुख्य शाखेच्या आवारातील पुतळ्यास मा. आ. चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले, आपले आयुष्य शेती आणि शेतकरी यांच्याशी एकरूप केले. शेतीबरोबर व्यवसाय व शिक्षणाबरोबर आर्थिक विकास हे सूत्र ठेवले. त्यांच्या विचारांचा वारसा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक जयसिंग पाटील (ठाणेकर), ॲड. बाजीराव शेलार, किशोर पाटील, विलास पाटील, संजय पाटील, आनंदराव पाटील, उत्तम वरुटे, भगवान पाटील, अनिल पाटील, दादासो लाड, पी. के. पाटील, पी. डी. पाटील, जयसिंग पाटील (यवलूज), प्रकाश पाटील (आकुर्डे), यल्लाप्पा कांबळे, आबा पाटील, आनंदा माने, दिलीप गोसावी, अनिता पाटील, माधुरी पाटील, कुंभी बँकेचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, डी. एस. राऊत उपस्थित होते.
(फोटो) कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक डी. सी. नरके यांच्या २३व्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील पुर्णाकृती पुतळ्यास चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अजित नरके, निवास वातकर, अरुण पाटील उपस्थित होते.