डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा नानावटी कॉलेजशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:09+5:302021-02-10T04:24:09+5:30
कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि डॉ. भानुबेन नानावटी ...
कसबा बावडा :
येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे या दोन संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. त्यानुसार दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांना अनेक लाभ होणार आहेत.
शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील माहितीची देवाण- घेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शॉर्ट टर्म कार्यशाळेमध्ये भाग घेण्यास संधी, एम. आर्च., पीएच.डी. व उच्च शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांना मदत करणे, कल्चरल एक्स्चेंज, शैक्षणिक व सामाजिक पद्धतीची देवाण- घेवाण, या कराराअंतर्गत होणार आहेत. सदरचा करार पाच वर्षांसाठी करण्यात आलेला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, आर्किटेक्चर विभागाचे डीन प्रो. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रो. आय. एस. जाधव व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.