डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कॉक्लीअर इम्ल्प्लांट सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:22+5:302021-08-25T04:29:22+5:30
जन्मजात कर्णबधिर असलेल्या लहान मुलांची श्रवणशक्ती मिळण्यासाठी 'कॉक्लीअर इम्प्लांट' ही शस्त्रक्रिया कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ...
जन्मजात कर्णबधिर असलेल्या लहान मुलांची श्रवणशक्ती मिळण्यासाठी 'कॉक्लीअर इम्प्लांट' ही शस्त्रक्रिया कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी दोन बालकांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ही शस्त्रक्रिया पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्येच उपलब्ध असून ही सुविधा देणारे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे कोल्हापुरातील पहिलेच हॉस्पिटल आहे. शुक्रवारी १ वर्ष व २ वर्षे वय असलेल्या दोन मुलींवर 'कॉक्लीअर इम्प्लांट'ची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर ही मुले ऐकू व बोलू शकतील. इतर समवयस्क मुलांबरोबर शाळेत शिकून स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री माने यांनी दिली.
यापुढील काळात राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रम आणि संवाद श्रवण व वाचा केंद्र यांच्या सहकार्याने 'कॉक्लीअर इम्प्लांट' ही शस्त्रक्रिया नियमितपणे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे केली जाणार आहे. श्रवणशक्ती कमी असणाऱ्या मुलांच्या पालकानी पुढील तपासणी, मार्गदर्शन व उपचारांसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले.