डी. वाय. पाटील विद्यापीठात आजपासून कॅन्सरवरील परिषद
By admin | Published: January 2, 2015 10:28 PM2015-01-02T22:28:39+5:302015-01-03T00:03:02+5:30
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आमंत्रित : एस. एच. पवार यांची माहिती
कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर व इंटरनॅशनल आॅन्कोपॅथॉलॉजी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवारी व रविवारी (दि. ४) डी. वाय. पाटील विद्यापीठात कॅन्सरवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एच. पवार व अधिष्ठाता डॉ. आर. एन. कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिसंवादासाठी कॅन्सर संशोधक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ज्ञांना आंमत्रित केले असून, कॅन्सरशी संबंधित रोग निदानावर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. प्रशांत जानी (कॅनडा), डॉ. भरत नथवाणी (अमेरिका), डॉ. जगमोहन सिद्धू (न्यूयॉर्क), डॉ. धनपत जैन (अमेरिका), डॉ. निर्मला जांभेकर (मुंबई) डॉ. एस. एच. पवार, डॉ. प्रमोद पुरोहित, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सूरज पवार (सर्व कोल्हापूर), डॉ. सचिन पाटील, डॉ. राखी जगदाळे (सांगली), डॉ. दीपक परिचारक, डॉ. पोळ (मिरज) यांचा प्रामुख्याने समावेश होणार आहे.
परिसंवादात कॅन्सरसंदर्भातील समाजातील सध्याचे प्रमाण, रक्तातील कॅन्सर, हाडाचा कॅन्सर, थॉयरॉईडचा कॅन्सर या विषयांवर मान्यवरांकडून माहिती दिली जाणार आहे. या परिसंवादामध्ये तब्बल २५० कन्सल्टंट यांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी डॉ. वि. वि. भोसले, डॉ. आर. एन. कदम, डॉ. एस. एस. मोरे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. डफळे, आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. (वार्ताहर)