डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे मोफत तपासणी व उपचार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:52+5:302020-12-23T04:19:52+5:30
या शिबिरात पोटाचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, थायरॉइड, स्त्रियांचे आजार, हाडे व सांधेदुखीचे आजार, लहान मुलांचे आजार, त्वचारोग, कान, ...
या शिबिरात पोटाचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, थायरॉइड, स्त्रियांचे आजार, हाडे व सांधेदुखीचे आजार, लहान मुलांचे आजार, त्वचारोग, कान, नाक, घसा व डोळ्यांचे आजार, मोतिबिंदू, रक्तदाब, डायबेटीस, त्याचप्रमाणे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्या अशा साथीच्या रोगांवरही मोफत उपचार व तपासणी करण्यात येत आहे.
बुधवारी (दि. २३ ) रोजी महावीर रुग्णालय विक्रमनगर व गुरुदेव विद्यानिकेतन फुलेवाडी येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, २४ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ हॉल, चव्हाण कॉलनी साळोखेनगर व सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर राजेंद्रनगर, शनिवार, २६ रोजी शिवगंगा कॉलनी हॉल, आपटेनगर व राजे संभाजी हॉल, फुलेवाडी रिंगरोड, सोमवार, २८ रोजी प्राथमिक शाळा राजोपाध्ये नगर, सानेगुरुजी वसाहत या ठिकाणी हे मोफत शिबिर होणार आहे. तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो २२ डी. वाय. पाटील शिबीर
टेंबलाबाई येथील शिबिराची पाहणी करताना डीन डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड.