डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा आयसेराशी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:53+5:302021-07-07T04:28:53+5:30

आयसेरा या कंपनीला अँटी कोविड सिरम तयार करण्यात यश आले आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीवर आधारित या औषधाच्या सध्या मानवी चाचण्या ...

D. Y. Memorandum of Understanding between Patil Abhimat University and ISERA | डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा आयसेराशी सामंजस्य करार

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा आयसेराशी सामंजस्य करार

Next

आयसेरा या कंपनीला अँटी कोविड सिरम तयार करण्यात यश आले आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीवर आधारित या औषधाच्या सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या कंपनीसोबतच्या करारामुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट, ट्रेनिंग व संयुक्त संशोधन करता येणार आहे. स्टेम सेल व मेडिकल बायोटेक्नाॅलॉजी या विभागांच्या वतीने सहयोग संशोधन, शोधनिबंध आणि पेटंट घेण्यास मदत होईल.

या करारावर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डी. व्ही. व्ही. भोसले यांनी, तर 'आयसेरा'च्या वतीने संचालक डॉ. नंदकुमार कदम व डॉ. धैर्यशील यादव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे सर, विभागप्रमुख डॉ. के. एस. करूपाईल, डॉ. आश्विनी जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: D. Y. Memorandum of Understanding between Patil Abhimat University and ISERA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.