डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये स्टेमसेल संशोधनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:01+5:302021-01-09T04:19:01+5:30
विद्यापीठाच्या सेंटर ऑफ इंटरडिसीप्लिनरी रिसर्च विभागात गेल्या आठ वर्षांपासून अनुभवी प्राध्यापकांकडून अद्ययावत प्रयोगशाळेत एमएस्सी स्टेमसेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन्स व ...
विद्यापीठाच्या सेंटर ऑफ इंटरडिसीप्लिनरी रिसर्च विभागात गेल्या आठ वर्षांपासून अनुभवी प्राध्यापकांकडून अद्ययावत प्रयोगशाळेत एमएस्सी स्टेमसेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन्स व एम.एस्सी. इन मेडिकल बायोटेक्नोलॉजी या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले जाते. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर देश-विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रात या शिक्षणाला प्रचंड मागणी असून हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा, औषध निर्माण कंपन्या, वैद्यकीय उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी; त्याचबरोबर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचीही संधी असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. स्टेमसेल व बायोटेकमध्ये नवनवे संशोधन व तंत्राचा वापर करून तसेच शोधनिबंध सादर करून स्वत:ची वेगळी ओळखही विद्यार्थ्याला निर्माण करणे शक्य असल्याचे लोखंडे व करुपाईल यांनी म्हटले आहे.