डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:18+5:302021-08-13T04:28:18+5:30

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा ३२ वा वर्धापनदिन गुरुवारी हॉटेल सयाजी येथे विशेष समारंभात करण्यात आला. डी. वाय. पाटील ...

D. Y. Patil Medical College is committed to quality medical education | डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी कटिबद्ध

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी कटिबद्ध

googlenewsNext

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा ३२ वा वर्धापनदिन गुरुवारी हॉटेल सयाजी येथे विशेष समारंभात करण्यात आला. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, आमदार जयंत असगावकर, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, तळसंदे येथील डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. वैद्यकीय महाविद्यालयामधून आतापर्यंत ४१०० विद्यार्थी एमबीबीएस झाले असून, ५०७ विद्यार्थी एमडी/एमएस झाले आहेत. अनेक डॉक्टर कोल्हापुरात रुग्णसेवा करत आहेत. देशभरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय सेवा याबरोबरच संशोधन क्षेत्रातही वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे. कोविड काळात हॉस्पिटलने अतुलनीय कामगिरी बजावली असून, रुग्णसेवेसाठी आमचे नेहमीच सर्वोच्च प्रधान्य राहील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित जाधव, उपकुलसचिव संजय जाधव, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, तळसंदे कॅम्पस संचालक डॉ. सतीश पावसकर, ग्रुपच्या विविध शिक्षण संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभागप्रमुख उपस्थित होते

चौकट : आरटीपीसीआर लॅब असणारे पहिले महाविद्यालय

कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वोत्तम टीचिंग - लर्निंग प्रक्रिया असलेले महाविद्यालय असल्याचे सांगितले. कोविड काळात खासगी क्षेत्रातील आरटीपीसीआर लॅब उभारणारे हे देशातील पहिले महाविद्यालय आहे. अत्याधुनिक सिम्युलेशन लॅबमुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व प्रध्यापकांनाही मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो : १२ डीवायपी

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ३२ व्या वर्धापनदिनी दीपप्रज्वलन करताना कुलपती डॉ. संजय डी. पाटील. यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील. यावेळी आमदार जयंत आसगावकर, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले. आदी उपस्थित होते.

Web Title: D. Y. Patil Medical College is committed to quality medical education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.