डी. वाय.ची १५ जानेवारीअखेरची बिले अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:51 AM2021-02-05T06:51:23+5:302021-02-05T06:51:23+5:30
पाटील म्हणाले, कारखान्याच्या २०२०-२१ च्या १८ व्या गळीत हंगामात कारखान्याने २ फेब्रुवारी २०२१ अखेर ३ लाख ८२ हजार २७० ...
पाटील म्हणाले, कारखान्याच्या २०२०-२१ च्या १८ व्या गळीत हंगामात कारखान्याने २ फेब्रुवारी २०२१ अखेर ३ लाख ८२ हजार २७० मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.१२ टक्के साखर उता-याने ४ लाख ६२ हजार ४०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगामात ३१ डिसेंबरअखेर गाळपास आलेल्या २,५६,१३० मे. टनाचे पेमेंट यापूर्वीच आदा केले होते. कारखाना चालू गळीत हंगामात गाळपास येणा-या उसास पहिल्या हप्त्यापोटी २९०० रुपये अदा करत असून, हंगाम समाप्तीनंतर ५० रुपयांचा दुसरा हप्ताही अदा केला जाणार आहे. शेतक-यांना त्यांचे ऊसापोटी जास्तीत-जास्त दर देता यावा याकरिता कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. २०२०-२१ च्या गळीत हंगामात कारखान्याने ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविलेले असून, ते पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.