डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांची घाटगे-पाटीलमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:58+5:302020-12-17T04:48:58+5:30

महाविद्यालयाच्या २०१९-२० बॅचचे विद्यार्थी अविराज चौगले, विवेक बोबडे, जान्हवी यादव, मनाली शिंगे, चेतन पाटील, सदानंद शेंदुलकर, अक्षय भोसले, सर्वेश ...

D. Y. Selection of 12 students of Patil Engineering in Ghatge-Patil | डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांची घाटगे-पाटीलमध्ये निवड

डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांची घाटगे-पाटीलमध्ये निवड

Next

महाविद्यालयाच्या २०१९-२० बॅचचे विद्यार्थी अविराज चौगले, विवेक बोबडे, जान्हवी यादव, मनाली शिंगे, चेतन पाटील, सदानंद शेंदुलकर, अक्षय भोसले, सर्वेश लोखंडे, सिद्धार्थ माणगावकर, ओमकार साळोखे, ऋषिकेश चव्हाण व विराज बोडके यांची कोल्हापूरमधील घाटगे-पाटील इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ट्रेनी ग्रॅज्युएट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयाच्या बी. ई. सिव्हिल विभागातील आनंद कल्याणकर, बाळू पाटील, नरसिंह बोयने, ओंकार पाटील, सागर बनकर, संकेत लोहार, सौरभ ढाणे, सौरभ गाताडे, यश माताडे व बी. ई. मेकॅनिकलच्या रोहन पाटील व उमैर वायकर अशा ११ विद्यार्थ्यांची ख्यातनाम मालमत्ता सल्लागार कंपनी ‘पिनक्लिक’मध्ये साहाय्यक मालमत्ता सल्लागार पदावर निवड झाली होती.

उत्तम दर्जाच्या नोकरी देण्यासाठी महाविद्यालयाकडून नियमितपणे अशा प्रकारचे कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केले जातात.

घाटगे-पाटील इंडस्ट्रीज व ‘पिनक्लिक’ कंपनीमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. क्षमा कुळहळ्ळी, प्रा. सुदर्शन सुतार, आदींनी अभिनंदन केले.

Web Title: D. Y. Selection of 12 students of Patil Engineering in Ghatge-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.