डी. वाय. पाटील साखर कारखान्यात १,५१,०११ व्या साखर पोत्यांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:34+5:302020-12-08T04:21:34+5:30
कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या अठराव्या गळीत हंगामात ३८ दिवसांत १ लाख ४७ हजार ४२० मे. टन उसाचे गाळप ...
कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या अठराव्या गळीत हंगामात ३८ दिवसांत १ लाख ४७ हजार ४२० मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १०.४६ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ५४ हजार ३०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे.
या कार्यक्रमास डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे व्हाईस चान्सलर, डीन, फायनान्सर ऑफिसर व शिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, दत्तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, बँक स्थायी अधिकारी एस. एम. यादव, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ – असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या साखर पोती पूजनप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय डी. पाटील, शिक्षण संस्थेतील अधिकारी, संचालक मंडळ, खातेप्रमुख व इतर.