वादळाचा फटका बसलेल्या तांबळेश्वर हायस्कूला दादासाहेब लाड यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:13+5:302021-04-17T04:23:13+5:30
भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडून तांबळेश्वर हायस्कूलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळेसाठी आर्थिक मदतीसाठी ...
भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडून तांबळेश्वर हायस्कूलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळेसाठी आर्थिक मदतीसाठी योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले. तांबाळेश्वर प्रशालेच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. को.जि.मा.शी चे संचालक एच.आर.पाटील, मुख्याध्यापक महादेव मोरस्कर ,निशिकांत चव्हाण ,मारुती लाड., प्रमुख उपस्थित होते.
तांबाळे परिसराला मंगळवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. यामध्ये श्री तांबळेश्वर हायस्कूलचे पत्रे उडून शाळेत पाणी शिरल्याने संगणक कक्ष , कॅम्प्युटर, प्रिंटर, जनरेटर, प्रोजेक्टर , शैक्षणिक साहित्य यांचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष भोसले यांनी शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी यासाठी दादासाहेब लाड यांना निवेदन दिले. यावेळी पी .एस .हळदकर , गजानन देसाई, यु.पी.घुगरे ,प्रकाश सांडुगडे ,प्रवीण पार्टे ,विजय आदित्य, सलीम काझी, दत्तात्रय यादव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
१६ कांडगाव दादा लाड
फोटो - श्री तांबळेश्वर हायस्कूलला नुकसान भरपाई मिळावी यासाठीचे निवेदन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांना देताना शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोसले व इतर.