Kolhapur: धोकादायक दरडींच्या भागांची रोज पाहणी करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:02 PM2023-07-21T12:02:14+5:302023-07-21T12:02:43+5:30

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट

Daily inspection of landslide prone areas, District Collector instructed | Kolhapur: धोकादायक दरडींच्या भागांची रोज पाहणी करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

Kolhapur: धोकादायक दरडींच्या भागांची रोज पाहणी करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये व भागामध्ये अतिवृष्टी, भूस्खलनाचा, दरडी कोसळण्याचा धोका आहे अशा गावांची महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रोज पाहणी करावी, एखाद्या ठिकाणी धोका वाटला तर तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवा, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना गुरुवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी अतिवृष्टी, दरडी कोसळणे, भूस्खलनाचा धोका व तत्पूर्वी प्रशासकीय पातळीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांची माहिती दिली.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ज्या भागांमध्ये अतिवृष्टी होते. भूस्खलन व दरडी कोसळण्याचा धोका आहे त्या भागांची स्थानिक प्रशासनाच्या वतीने रोज पाहणी करण्यात यावी. या पाहणीदरम्यान एखाद्या ठिकाणी जमिनीची भेग वाढली आहे. वाहत्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग दिसत आहेत, जलाशयांना मोठी गळती जाणवत असेल किंवा एखाद्या भागात मातीचे ढिगारे साचत आहे, लहान-मोठे दगड पडत आहेत, असे दिसल्यास त्याची माहिती तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवा, अशी ठिकाणे मानवी वस्तीपासून जवळ असतील तर बाधीत होऊ शकणाऱ्या कुटुंबांचे कोठे स्थलांतर करायचे त्या जागा आधीच निश्चित करून ठेवा.

धोकादायक ठिकाणी असलेली मानवी वस्ती
करवीर : शिपेकरवाडी
पन्हाळा : मराठवाडी, आपटी
राधानगरी : म्हासुर्ली-खुपलेवाडी, पाटपन्हाळा

Web Title: Daily inspection of landslide prone areas, District Collector instructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.