दूध संस्थांनी उत्पादकांचे हित डोळ्यांसमोर ठेवावे - महादेवराव महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:50+5:302020-12-17T04:48:50+5:30
कोल्हापूर : दूध उत्पादक हा प्राथमिक संस्थांचा कणा असून त्याचे हित डोळ्यांसमोर ठेवून कामकाज करावे, असे आवाहन माजी आमदार ...
कोल्हापूर : दूध उत्पादक हा प्राथमिक संस्थांचा कणा असून त्याचे हित डोळ्यांसमोर ठेवून कामकाज करावे, असे आवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.
माजगाव (ता. पन्हाळा) येथील मेढेश्वर दूध संस्था व शिरोळ तालुक्यातील सहा दूध संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप बुधवारी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख, रघुनाथ चिखलीकर, अजित शहापुरे, महेश पाटील, मोहन दिंडे, जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील यांच्यासह दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : माजगाव (ता. पन्हाळा) येथील मेढेश्वर दूध संस्थेस बुधवारी महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी साहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख, रघुनाथ पाटील, महेश पाटील, आदी उपस्थित हाेते. (फोटो-१६१२२०२०-कोल-गोकुळ)
- राजाराम लाेंढे