Kolhapur News: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद

By ओमकार संकपाळ | Published: June 13, 2023 12:21 PM2023-06-13T12:21:48+5:302023-06-13T12:22:08+5:30

पुन्हा कधी सुरु होणार जंगल सफारी..जाणून घ्या

Dajipur Jungle Safari in Radhanagari Sanctuary is closed for tourists | Kolhapur News: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद

Kolhapur News: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद

googlenewsNext

गौरव सांगावकर 

राधानगरी : राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी दिनांक १२ जून ते ३१ ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. दरवर्षी पावसामुळे दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात येते. 

राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य हे निसर्गप्रेमींसाठी पर्यटनाचे आकर्षण आहे. नोव्हेंबर ते मे अकेर पर्यंत अनेक विदेशी पर्यटक या अभयारण्याला भेट देत असतात. स्थानिक वन समितीच्या वाहनातून २१ कि.मी अभयारण्यातून ही जंगल सफारी केली जाते. ३५१.१६ चौ.कि.मी क्षेत्रफळ असलेल्या अभयारण्यामध्ये विविध प्राणी पक्षी फुलपाखरे आढळतात. 

पावसाळ्यामध्ये मात्र पाच महिन्याच्या कालावधीसाठी अभयारण्य प्रवेश निषीद्ध केला जातो. या कालावधीमध्ये जंगल क्षेत्रात प्रवेश केला तर वन्यजीव कायद्यानुसार कारवाई केली जाते. १ नोव्हेंबर पासून अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी खुला केला जाईल.

Web Title: Dajipur Jungle Safari in Radhanagari Sanctuary is closed for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.