दाजीपूर पदभ्रमंती २६ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:01 AM2020-12-05T05:01:45+5:302020-12-05T05:01:45+5:30
घनदाट अशा जंगलामधील दाजीपूर अभयारण्यामध्ये फिरण्याची इच्छा अनेकांना असते; परंतु बहुतेकांना जंगलाची फारशी माहिती नसते. दाजीपूर गवा अभयारण्यातील घनदाट ...
घनदाट अशा जंगलामधील दाजीपूर अभयारण्यामध्ये फिरण्याची इच्छा अनेकांना असते; परंतु बहुतेकांना जंगलाची फारशी माहिती नसते. दाजीपूर गवा अभयारण्यातील घनदाट अशा जंगलामधील वनऔषधांची माहिती घेणे, झांजू गगनगिरी आश्रम, उंबराचे पाणी, गडगड्याचा ओढा, पाटाचा डंक, भोपळ्याचा सर, वाघाचे पाणी, सांबर कुंड, महादेव मंदिर येथील गगनगिरी आश्रम असा भाग या पदभ्रमंतीमध्ये येतो. पावसाळ्यात सहा हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. सात वर्षातून एकदाच फुलणारी कारवी आहे. शेंदरी, पाथरी अशा अनेक खुरट्या वनस्पती आहेत. शहरी संस्कृतीत वाढलेल्या साहसी युवक, युवतींना या पदभ्रमंतीचा अवर्णनीय सुखद अनुभव घेता यावा म्हणून या मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोहीम प्रमुख पोलीस निरिक्षक संजय जाधव यांनी केले आहे.
(विश्र्वास पाटील)